Sunday , July 26 2026
Breaking News

पावसाने दडी मारल्याने टँकरद्वारे शेतात पाण्याची फवारणी!

Spread the love

 

बेळगाव : बिपरजॉय चक्रीय वादळामुळे यंदा पाऊस लांबणीवर पडला आहे. त्यामुळे पेरणी केलेले शेतकरी संकटात सापडले आहेत. बेळगाव भागातील शेतकऱ्यांनी पावसाच्या अपेक्षेने शेतात पेरणी केली मात्र पाऊस नसल्याने पेरणी केलेले भात सुकू लागले आहे. त्यामुळे पाण्याच्या टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. यावर्षी मान्सून लांबला आहे त्याचबरोबर वळीवाने देखील दडी मारली होती. त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पेरणी केलेले पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्याला टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
बेळगाव परिसरातील येळ्ळूर, धामणे, वडगाव, शहापूरसह अनेक ठिकाणी शेतकरी टँकरच्या पाण्याचा आधार येताना दिसत आहेत. प्रत्येक टँकरला शेतकऱ्यांना एक हजार रुपये मोजावे लागत आहेत. पेरणी सुकू नये म्हणून दर चार दिवसाला टँकरद्वारे शेतात पाण्याची फवारणी करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *