बेळगाव : बेळवट्टी ग्रामपंचायत अध्यक्षपदी ग्राम विकास आघाडीचे विठ्ठल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी विठ्ठल पाटील यांचा पुष्पहार अर्पण करून सत्कार केला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी एपीएमसी अध्यक्ष अप्पा जाधव, पुंडलिक पावशे, नानू पाटील, नारायण सांगावकर, किसन सुंठकर, मनोहर संताजी, म्हाळू मजुकर, नारायण कांबळे, कृष्णा कांबळे, यल्लाप्पा अष्टेकर उपस्थित होते व विठ्ठल पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायत येथे पार पडली. बेळवट्टी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये बेळवट्टी, बाकनूर, बडस, धामणे यास या गावचा समावेश आहे. मागील ग्रामपंचायत अध्यक्षपदी म्हाळू मजूकर यांनी सव्वा वर्ष आपला ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा दिल्यानंतर विठ्ठल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बेळवट्टी ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. निवडणूक अधिकारी म्हणून अशोक शिरूर हे उपस्थित होते. बेळवटी ग्रामपंचायतमध्ये एकूण 11 सदस्य संख्या आहे. या निवडणुकी वेळी 11 पैकी नऊ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या ग्रामपंचायत अध्यक्षपदासाठी विठ्ठल पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. विठ्ठल पाटील हे बडस गावचे ग्रामपंचायत सदस्य असून गेल्या अनेक वर्षापासून ते सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांची ग्रामपंचायत अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे या परिसरातील सर्व गावांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ही निवड प्रक्रिया बिनविरोध करण्यासाठी बेळवटी ग्रामपंचायत उपाध्यक्ष महादेवी मेदार, सदस्य म्हाळू मजुकर, अनुराधा कांबळे, रूपा सुतार, रेणुका सुतार, निशा चांदीलकर, रेशमा कुलम, दाकलू पाटील, उपस्थित सहकार केले.
Belgaum Varta Belgaum Varta