बेळगाव : मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन गणेशपुर रोड येथील बेळगावच्या शिवसेना (सीमाभाग) कार्यालयात आज सोमवारी सकाळी उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर वर्धापन दिन कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्या हस्ते शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे तर बेळगाव तालुका प्रमुख सचिन गोरले यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवरायांसह शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जयजयकार करण्यात आला. शिवसेना उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, युवा सेनेचे विनायक हुलजी, येल्लारी पावशे, वैभव कामत, जय पावशे, उमेश चौगुले, तानाजी पावशे, राजू कणेरी, भरमा सावगांवकर, प्रदीप सुतार आदी बहुसंख्य शिवसैनिक व हितचिंतक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta