Friday , March 6 2026
Breaking News

रयत गल्लीतील कूपनलिका कधी होणार दुरुस्त?

Spread the love

 

बेळगाव : प्रभाग क्रमांक 39 मधील रयत गल्ली, वडगाव येथील खूप नलिका वर्षभरापासून नादुरुस्त अवस्थेत पडली आहे ही खूप दुरुस्त केली जाईल का असा प्रश्न या गल्लीतील नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केला आहे.

रयत गल्ली, वडगावमध्ये बहुसंख्य शेतकरी असल्याने अनेकांच्या घरात गुरढोरं आहेत. त्यामुळे या भागातील लोकांना पाणी जास्त लागत. गल्लीच्या कोपऱ्यावर सार्वजनिक विहिर आहे. पण पाऊस न झाल्याने पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याची कमतरता भासू लागली आहे.

गल्लीतील कूपनलिका नादुरुस्त झाली असून ती दुरुस्त करण्याची मागणी वर्षभरापासून केली जात आहे. तरीही याकडे महापालिका प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. गेल्या वर्षभरापासून बंद पडलेली ही कुपनलीका त्वरित दुरुस्त केली जाईल का? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *