बेळगाव : बेळगावचा श्वास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हेक्सीन डेपोमध्ये बेकायदेशीररित्या कामे करण्यात आली. त्या कामासंदर्भात जिल्हा आरोग्य विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र परवानगी विना व्हॅक्सिन डेपोतील झाडे तोडून विकासकामे राबवण्याचा बेकायदेशीर रित्या प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आता जिल्हाधिकारी आरोग्य अधिकारी यांनी स्मार्ट सिटीच्या एमडी विरोधात टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानंतर एमडी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्हेक्सिन डेपोला भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली. यावेळी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेताच याठिकाणी कामे करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यानंतर सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. व्हेक्सिन डेपो परिसरात ऐतिहासिकला लस संस्था होती. या ठिकाणी औषधी वनस्पती असलेली झाडे तोडून विकास कामे करण्यात आली. यामुळे पालकमंत्री सतिश जारकीहोळी चांगलेच संतापले. स्मार्ट सिटीचे काम यापूर्वीच थांबविण्यात आले आहे. याबाबत न्यायालयातील खटला दाखल आहे. असे असताना काम करणे चुकीचे आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
Belgaum Varta Belgaum Varta