बेळगाव : अभ्यासाबरोबर खेळाचीही आवड निर्माण व्हावी यासाठी बेळगावच्या इनरव्हील लेडीज विंग यांच्यातर्फे भूतरामहट्टी येथील श्री भगवान महावीर इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
शाळेच्या प्रांगणात हा क्रीडा साहित्य वितरणाचा कार्यक्रम पार पडला. शाळेच्या प्राचार्या निशा राजेंद्रन यांनी इनरव्हील लेडीज विंगच्या अध्यक्ष श्रीमती शालिनी चौगुला आणि मेधा शहा यांचे स्वागत केले. यावेळी शाळा समिती सदस्य रमेश चिवटे, चेअरमन सुधर्म मुडलगी, सुहास हुलबत्ती, प्रशिक्षक जोसेफ परेरा, सुनील देसाई यासह शिक्षक उपस्थित होते. शालिनी चौगुला आणि मेधा शहा यांच्या हस्ते क्रिकेट बॅट, हॉलीबॉल, बॅडमिंटन रॅकेट, कॅरम आदी साहित्य विद्यार्थ्यांकडे सुपूर्द केले.
शाळेतील नवोदित खेळाडू या क्रीडा साहित्याचा वापर करून निश्चितच यशोशिखर गाठतील आणि शाळेचे नाव लौकिक करतील, असे यावेळी बोलताना प्राचार्या निशा राजेंद्रन म्हणाल्या.
यावेळी निशा राजेंद्रन यांनी इनरव्हील लेडीज विंगच्या उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta