बेळगाव : बेळगाव शहरातील भाऊराव काकतकर महाविद्यालयामध्ये (बी. के. कॉलेज) नुकताच झंकार आणि भित्ती पत्रकाचा अनावरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्य शोभा नाईक आणि अर्जुन पुरस्कार विजेते मुष्टियुद्ध मुकुंद किल्लेकर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाडाच्या रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना शोभा नाईक यांनी आपल्यातील सुप्त गुण विविध कलागुणांच्या माध्यमातून व्यक्त करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
मुकुंद किल्लेकर यांनी शिक्षणाबरोबर शारीरिक आणि मानसिक विकास होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. संस्थेचे सचिव प्रा. विक्रम पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी रिहान याने स्वागत गीत सादर केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास कला विभागाच्या चेअरमन प्रा. अनिता पाटील, प्रा. ए. एस. कुलकर्णी, बी. आय. वसुलकर प्रा. नीता पाटील, प्रा. व्ही. वाय. पाटील आदींसह विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती आवडण हिने केले तर श्रावणी चौगुले हिने सर्वांचे आभार मानले.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …