बेळगाव : भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा शाखा, महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव, अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद आणि एल्गार परिषद बेळगाव, शाहू फुले आंबेडकर सोशल फाउंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छ. शाहू महाराज यांची 149 वी जयंती साजरी करण्याबरोबर विशेष व्याख्यानाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
सदाशिवनगर येथील बुद्ध विहार आंबेडकर भवन या ठिकाणी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष समाजसेवक यमनाप्पा पी. गडीनाईक हे होते. तसेच प्रमुख वक्ते म्हणून बेळगांव येथील ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्रा. के. डी. मंत्रेशी आणि कवी प्रा. निलेश शिंदे बेळगांव हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष व म. ए. समितीचे नेते निंगाप्पा विठ्ठल जाधव, समितीचे नेते आणि माजी नगरसेवक अनिल पाटील, रमाकांत मेत्री, सेक्रेटरी राजेंद्र कांबळे, जीवन कुरणे, समितीचे कार्यकर्ते नारायण सांगावकर, सुधिर चौगुले, महादेव तळवार, लक्ष्मण नाईक, मल्लिकार्जुन राशिंगे, अनंत कोलकार हजर होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सदर जयंती कार्यक्रमानिमित्त प्रमुख वक्ते प्रा. के.डी. मंत्रेशी आणि प्रा. निलेश शिंदे यांनी “शाहू महाराज जीवन कार्य आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व एक चिंतन” या विषयावर व्याख्यान दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विद्यानिकेतन शाळेचे शिक्षक सहदेव कांबळे यांनी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित गीत गायन केले. यावेळी माजी नगरसेवक अनिल पाटील, एपीएमसीचे माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव यांनीही समायोचित विचार व्यक्त केले. प्रारंभी स्वागत नारायण सांगावकर यांनी केले. प्रास्ताविक भीमा कांबळे यांनी केले. परिचय नागेंद्र कांबळे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन राजेंद्र कांबळे व जीवन कुरणे यांनी केले, तर सागर गुंजीकर यांनी आभार मानले. यावेळी आनंद कोडसंगी, गंगाराम अंकलगी, लक्ष्मण नाईक, महादेव तलवार सिद्धाप्पा कोलकर, अनंत कोलकर, एम. आर. शेट्टी, चांगदेव हुवाप्पणावर, मरप्पा हुवाप्पणावर, जोतिबा निंगाप्पा पाटील, अजित पाटील, श्रीधर पाटील, सिद्धाप्पा कांबळे, विजय पाटील, उदय पाटील, नारायण पाटील, तसेच वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta