Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर विद्यानगरात गटारीच्या कामाचा शुभारंभ, काम प्रगतीपथावर

Spread the love

 

खानापूर : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्या नगरात गटारीच्या कामाचा शुभारंभ नुकताच करून विकास कामे प्रगतीपथावर सुरू आहेत.
सरकारच्या १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून खानापूर विद्या नगरात गटारीच्या ७२ मीटर लांबीच्या कामाला मोठ्या उत्साहाने सुरूवात झाली.
नंदगड गावचे कंत्राटदार रवी वडर यांनी गटारी काम हाती घेतले असुन उत्कृष्ट दर्जाच्या गटारीचे काम सुरू केले आहे.
या गटारीच्या कामासाठी खानापूर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष व विद्यानगरचे नगरसेवक नारायण मयेकर यांनी विषेश प्रयत्न करून गटारीचे काम व्हावे यासाठी सदैव प्रयत्नशील होते.
विद्या नगरात लवकरच गटारी बरोबर रस्त्याचे काम करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक नारायण मयेकर यांनी बोलताना सांगितले. खानापूर शहराबरोबर विद्यानगरातील गटारी, रस्ते, पथदिवे, पाणी पुरवठा सुरळीत करून रहिवाशाची सोय करण्यासाठी मी सतत प्रयत्न करणार असल्याचे त्यानी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *