बेळगाव : दोदवाड (ता. बैलहोंगल, जि. बेळगाव) गावातील ईदगाहसाठी असलेल्या 2 एकर जमिनीची नोंद सर्व्हेच्या 11 नंबर कॉलममधून काढून 9 नंबर कॉलममध्ये करावी अशी मागणी दोदवाडच्या जुम्मा मस्जिद कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दोदवाड येथील जुम्मा मस्जिद कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी सकाळी उपरोक्त मागणीची निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. दोदवाड गावातील आरएस नं. 379 मधील 2 एकर जमीन ईदगाहसाठी देण्यात आली आहे. मात्र याची सरकारी कागदोपत्री सर्व्हेच्या 11 नंबर कॉलममध्ये नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांची माहिती निवेदनात नमूद करण्यात आली असून त्यासाठी सदर 2 एकर जमिनीची नोंद सर्व्हेच्या 11 नंबर कॉलममधून काढून 9 नंबर कॉलममध्ये करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. आपल्या मागणी संदर्भात दोदवाड जुम्मा मस्जिद कमिटीच्या मगदूम साहब नदाफ यांनी प्रसिद्धी माध्यमांना अधिक माहिती दिली. याप्रसंगी वासिम नदाफ, मक्तूम नदाफ, बाबाजान नदाफ, महबूब हुच्चकट्टी आदी कमिटीचे इतर सदस्य आणि गावकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta