बेळगाव : शासनाच्या प्रशासकीय व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणून सुशासन देण्यास आमचे प्राधान्य आहे. यासंदर्भात महसूलमंत्री कृष्णा भैरेगौडा यांनी अधिकाऱ्यांना कार्यक्षमतेने व त्वरीत काम करावे, अशा सूचना दिल्या.आज शुक्रवारी (३० जून) सुवर्ण विधानसौध येथे बेळगाव विभागाचे जिल्हाधिकारी आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.
या बैठकीत पुढे बोलताना मंत्री भैरेगौडा म्हणाले, शासकीय कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत महसूल विभागाची मोठी जबाबदारी असते. महसूल विभागाच्या कामकाजावर सरकारचे चांगले नाव अवलंबून असते. त्यामुळे सर्वांनी सुशासन देण्यासाठी काम केले पाहिजे.
सार्वजनिक योजनांच्या अंमलबजावणीत अधिकाऱ्यांची भूमिका विशेषतः महसूल विभागाची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे जनतेच्या हिताची कामे करण्यासाठी सरकारला सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.
दर महिन्याला महसूल विभागाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल. त्यामुळे सुशासनाच्या दिशेने सर्वांनी कार्यक्षमतेने काम केले पाहिजे, असे मत मंत्री कृष्णा भैरेगौडा यांनी व्यक्त केले.
गेल्या वर्षी आणि मागील वर्षाच्या संबंधात कोविड आणि दुष्काळासह विविध नैसर्गिक आपत्तींसाठी जारी केलेल्या अनुदानाच्या वापरासाठी कालमर्यादा निश्चित केली जाईल. त्यानंतर अभिप्राय घेतला जाईल, असे मंत्री कृष्णा भैरेगौडा यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta