मुतगे : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मुतगे येथे माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना अर्थ सहाय्य करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा सुधारणा समितीचे सदस्य एन. डी. बंडाचे होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. शाळा सुधारणा समितीचे सदस्य नारायण कणबरकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. माजी विद्यार्थी श्रीनिवास पाटील, डॉ. सुधाकर पाटील, भैरू पाटील यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पी. वाय. पाटील म्हणाले की, शाळेचे माजी विद्यार्थी नारायण कणबरकर यांनी माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून दरवर्षी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयाचे शालेय शुल्क व गणवेश खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य केले. विद्यार्थ्यांनी याची जाणीव ठेवून आपले ध्येय पूर्ण करावे, गावचे व शाळेचे नाव उज्वल करावे, असे ते म्हणाले.
यानंतर शाळा समितीचे सदस्य भालचंद्र पाटील, माजी मुख्याध्यापक एम वाय केदार, प्रभारी मुख्याध्यापक बी.बी.कोंडसकोप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थी अलंकार आलासे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एन. डी. बंडाचे यांनी अध्यक्ष भाषण केले. याप्रसंगी दहावी ते पदवी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या एकूण 17 विद्यार्थ्यांना रोख रक्कम वाटप करण्यात आली. यावेळी शिरीष पाटील, प्रभाकर पाटील, सुधीर पाटील, राजू कणबरकर, वसंत पाटील, प्राचार्य एस. एस. जाधव, स्नेहल चौगुले, बाबुराव पाटील, मनोज पाटील, श्रीराम पाटील, भाऊसाहेब कणबरकर, परशराम कणबरकर, राजु नारायण पाटील, किरण केदार, भूषण पाटील, सुबोध चौगुले, शुभम चौगुले, भाग्यश्री इंगळे, स्नेहल चौगुले, रवी परमोजी, संदीप पाटील, प्रभाकर पाटील, वसंत पाटील, किरण पाटील, बी.डी. कडेमनी, आर. एम. चौगुले, जयंत बंडाचे, सचिन श्रीपती पाटील, वर्षा पोटे, संदीप बाबासाहेब पाटील आदी यांनी आर्थिक मदत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. के. मोरे यांनी केले तर आभार लक्ष्मण पाटील यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta