Thursday , March 5 2026
Breaking News

हिरेकुडी येथील बेपत्ता जैन मुनीचा संशयास्पद मृत्यू

Spread the love

 

चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील जैन मुनी आचार्य 108 कामकुमार नंदी महाराज स्वामी यांचा मृतदेह शुक्रवारी रात्री संशयास्पदरित्या आढळला आहे.
चिकोडी हिरेकुडीमधून जैन मुनी बेपत्ता झाल्याची तक्रार चिकोडी पोलिसात नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री उशिरा या जैन मुनींचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला असून त्यांच्या शरीरावर जखमा आहेत.
दोन दिवस मठामधून बेपत्ता झाल्यानंतर स्वामीजींच्या भक्तांनी शोध मोहीम केल्यानंतर अखेर चिकोडी पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची घटना तक्रार दाखल केली होती.
या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर शुक्रवारी रात्री जैन मुनींच्या मृतदेहाचा पत्ता लागला. मृतदेहावर जखमांच्या खुणा असल्यामुळे घातपात झाला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आणि नेमके स्वामींच्या मृत्यूचे कारण काय त्यांचा घात झाला आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *