बेळगाव : जैन मुनींच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असता त्यांनी आर्थिक व्यवहारातून मुनींची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, रायबाग तालुक्यातील कटकभावी गावातील नारायण माळी हा गेल्या अनेक वर्षापासून जैनमुनी आश्रमाजवळ भाडेतत्त्वावर जमीन नांगरत होता. यावेळी त्याने जैन मुनीशी जवळीक साधली आणि आश्रमात छोटीमोठी कामे करून जैन मुनींचा विश्वास जिंकला.
वैयक्तिक कारणासाठी माळी याने जैन मुनींकडून 6 लाख रू. उसने घेतले होते. पैसे परत मागितल्यानेच जैन मुनींच्या हत्येचा कट शिजला.
खुन्याने रचले कथानक
दहाच्या सुमारास मुनींना भेटण्यासाठी दोन लोक आले होते. त्यांनी जॅकेट घातले होते. ते मुनींशी वाद घालत होते. त्यावेळी मी आत गेलो असता तू निघून जा, माझं मी पाहतो, असे मुनींनी मला सांगितले.
५ जुलैपासून बेपत्ता असलेले मुनी गेले कुठे? त्यामुळे मी तेथून निघून आलो.’ असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यामुळे त्यांनी त्या दोघांना ओळखू शकतोस का? अशी विचारणा पोलिसांनी केली असता नारायणने नाही. गांभीर्याने तपास सुरू केला. मुनींना भेटलेली शेवटची व्यक्ती कोण? याचा जेव्हा तपास सुरू झाला, तेव्हा असे सांगितले. नारायणचे नाव समोर आले. त्या रात्री मुनींकडे नारायण आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. यावेळी नारायणने स्वरचित अन् काल्पनिक कथानक पोलिसांना ऐकवले. तो म्हणाला, ‘त्या दिवशी (बुधवारी) रात्री कबुली दिली.
पोलिसांनी नारायणला तीनवेळा ठाण्यात आणून चौकशी केली. त्यानंतर पोलिसांना त्याच्यावरच संशय आला. पोलिसी खाक्या दाखवत जेव्हा खोलवर चौकशी केली तेव्हा त्याने खुनाची कबुली दिली.
आधी शॉक, मग टॉवेलने गळा आवळला
नारायण व त्याच्या साथीदाराने हा निर्घृण खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. मुनींना आधी विजेचा शॉक दिला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला नसल्याचे लक्षात आल्यानंतर टॉवेलने त्यांचा गळा आवळला. त्यांच्या शरीराचे कोयत्याने नऊ तुकडे केले. हे तुकडे मुख्य संशयिताने आपल्या गावाकडील कटकभावी येथील शेतवडीतील कुपनलिकेत टाकून त्यावर २० फूट माती घातली. कूपनलिकेत डोके अखंड जात नसल्यामुळे त्याचेही भाग करून कूपनलिकेत भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
Belgaum Varta Belgaum Varta