येळ्ळूर : सर्व थरातील मानवी जीवनात तणाव वाढलेला आहे. त्याचबरोबर चमचमीत आणि तयार खाद्य पदार्थांची रोजच्या आहारात वाढ झालेली आहेत. त्याच बरोबर अनेकांना अनेक प्रकारची व्यसने आहेत. त्यामुळे शरिरामध्ये अनेक आंतरश्वाव्यात अनिचमितता येवून अवयवामध्ये बिघाड होत आहे. याबद्दलचे सविस्तर विवेचन “माधवबाग” मुंबई विभागाचे मेडीकल हेड डॉ. निलेश कुलथे यांनी “जीवनशैलीमुळे होणारे आजार आणि त्यापासून मुक्तता मिळविण्याचे उपाय”चा विषयावर नवहिंद क्रीडा केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य विषयक जागृती कार्यक्रमात काढले. अध्यक्षस्थानी शिवाजीराव सायनेकर हे होते.
डॉ. निलेश कुलथे पुढे म्हणाले की, सध्याची जीवन शैली ही आरोग्याला घातक आहे. माणसाने नियमित व्यायाम, योगा, प्राणायम आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवण्यास मानवी जीवन निरोगी होईल यांची त्यांनी खात्री दिली. महिलांनीही आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. अलोपॅथीची औषधे पारिणामकारक आहेत पण त्यांचा दीर्घ सेवनाने आरोग्यावर विपरित परिणाम होतात, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी सांगितली.
प्रारंभी उपाध्यक्ष श्री. आनंद पाटील यांनी गणेशवंदना सादर केली. सेक्रेटरी श्री. अनिल हुंदरे यांनी प्रास्ताविक व उपास्थितांचे स्वागत केले.
व्यासपीठावर हरिमंदिर येथील “माधव बाग” क्लिनीकच्या डॉ. संगिता खांजे, नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर, नवहिंद मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन दशरथ पाटील, प्रियदर्शनी नवहिंद महिला पंतसंस्थेच्या चेअरपर्सन सौ. माधुरी पाटील, महिला प्रबोधन केंद्राच्या अध्यक्षा सौ. नम्रता पाटील विराजमान होत्या.
याप्रसंगी माजी जि. प. सदस्य श्री. अर्जुन गोरल, माजी ता. पं. सदस्य श्री. रावजी पाटील, येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे कार्याध्यक्ष श्री. दुद्दाप्पा बागेवाडी, ग्राम पंचायत अध्यक्ष श्री. सतिश पाटील, रमेश मेणसे, प्रमोद पाटील, शिवाजी नांदूरकर, बाळू भडगावी, सूर्यकांत मुरकुटे, महाराष्ट्र हायस्क्कूलचे मुख्याध्यापक श्री. बी. पी. कानशिडे, नामदेव कानशिडे, सौ. सुरेखा सायनेकर, संध्या हुंद्रे, शुभांगी पाटील, रुपा जाधव, निता जाधव, उदय जाधव, संभाजी कणबरकर, नारायण जाधव, प्रताप पाटील, सुधीर माणकोजी, दिनेश पाटील, परशराम कंग्राळकर, श्रीधर धामनेकर, अंनत मजूकर, वाय. पी. देसूरकर, रामचंद्र कुंगजी, नारायण बस्तवाडकर यादी उपस्थित होते.
श्री. प्रकाश अष्टेकर यांच्या आभारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta