बेळगाव : येळ्ळूर रस्त्यापासून सुरु होणारा बळ्ळारी नाला परिसरात आठ दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने मोठी पूर परिस्थिती निर्माण होऊन परिरातील अनगोळ, शहापूर, वडगाव, माधवपूर, जूनेबेळगाव, हालगा, अलारवाड, बेळगावसह इतर शिवारात पूर आल्याने शेतकऱ्यांच्या भातपीकांसह इतर पीकं पाण्यात असल्याने संपूर्ण शेतकरी चिंतेत आहे. याला मुख्य कारण बळ्ळारी नाल्याची खुदाई न झाल्याने गाळ व जलपर्णीने नाल्याचा तळ उंच तर शिवारांचा तळ खाली झाल्याने बळ्ळारी नाल्यातून पाण्याचा निचरा न होता शिवारातच थांबल्याने पीकं नष्ट होतात.कारण सद्या पीकं जवळपास एक फूटापर्यंत उंच झाली होती.ती आता पाण्यात बुडल्याने कुजण्याचा धोका आहे. मराठी, कानडी प्रसारमाध्यमांनी सदर पुराच्या बातम्या प्रसारीत केल्याने बेळगाव जिल्हा क्रूषी संचालक शिवधगौडा पाटील, उपसंचालकांसह ग्रामसेवकांनी येळ्ळूर व यरमाळ रस्त्यावरुन अनगोळ, शहापूर, वडगाव, माधवपूर, जूनेबेळगाव सह इतर भागात पसरलेल्या पूराची पहाणी करुन सरकारला सर्व पीक नुकसानाची इतंभूत माहिती पाठवली जाईल अशी ग्वाही दिली.