Sunday , September 22 2024
Breaking News

गृहलक्ष्मी नोंदणीसाठी लॉगिनचा गैरवापर; दोघांविरोधात तक्रार दाखल

Spread the love

 

बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी ग्राम वन केंद्राच्या लॉगिन आयडीचा वापर करून लोकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेळगावमधील चव्हाट गल्ली येथे जनता ऑनलाइन केंद्र चालवणारे अद्रिश आर.टी. आणि मुतगा ग्राम वन एक केंद्रातील किरण चौगला यांच्याविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गृहलक्ष्मी लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी पैसे वसूल केले जात असल्याच्या सार्वजनिक तक्रारीनंतर अधिकाऱ्यांच्या पथकाने आज चव्हाट गल्ली येथील जनता ऑनलाइन केंद्रावर छापा टाकला.

महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक आर. नागराज, बेळगाव तहसीलदार सिद्धराय बोसगी आणि नगर बालविकास प्रकल्प अधिकारी बजंत्री यांनी जनता ऑनलाइन केंद्रावर छापा घातला. यानंतर केंद्राला कुलूप लावून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांच्या नोंदणी प्रक्रियेदरम्यान नियमबाह्य काम करणाऱ्या मुतगा ग्राम वन केंद्राचा परवानाही रद्द  करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

मराठी भाषा व रोजगाराच्या दिशा यावर उद्या चर्चा

Spread the love  बेळगाव : कोरे गल्ली शहापूर येथील सरस्वती वाचनालय, बेळगाव येथे रविवारी (ता.२२) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *