अथणी : गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थी नोंदणीसाठी पैशाची मागणी करणाऱ्या ग्रामपंचायतीमधील केंद्र अधिकाऱ्याला ताब्यात घेऊन नोंदणी केंद्राला टाळे ठोकण्यात आले आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अथणी तालुक्याच्या आवरखोड गावात एका ऑनलाईन केंद्रावर गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थी नोंदणीसाठी जनतेकडून पैसे वसूल केले जात असल्याची, तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. याची तात्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्याला ताब्यात घेऊन नोंदणी केंद्र सील करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्याला ताब्यात घेत नोंदणी केंद्राला टाळे ठोकून कारवाई करण्यात आली.
अशा पद्धतीने कोणत्याही नोंदणी केंद्रावर सरकारी सुविधांसाठी पैशाची आकारणी केल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे तक्रारी करा असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta