बेळगाव : बेळगाव बार असोसिएशन वकील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वकील सुधीर चव्हाण यांचा सकल मराठा समाजाचे नेते आणि विमल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण जाधव यांनी सन्मान केला.
जवळपास तीन हजार हून अधिक वकील सदस्य असलेल्या बेळगाव बार असोसिएशन या प्रतिष्ठित संघटनेच्या अध्यक्षपदी क्रियाशील कार्यकर्ते, वकील सुधीर चव्हाण यांची निवड ही मराठा समाजाकरिता अभिमानास्पद बाब असल्याचे किरण जाधव यावेळी बोलताना म्हणाले.
जवळपास 30 हून अधिक वर्षांनी मराठी माणसाला बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्षपद मिळाले आहे. सुधीर चव्हाण यांच्या क्रियाशील आणि सेवाभावी कार्याची ही पोचपावती असून ज्त्यांच्या या निवडीने मराठी माणसाची मान उंचावली आहे, असेही किरण जाधव यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी किरण जाधव यांनी सुधीर चव्हाण यांचा गौरव करून शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta