Tuesday , March 3 2026
Breaking News

बेळगावच्या खेळाडूंनी मारली बाजी

Spread the love

 

बेळगाव : बेंगळुरू येथील सी एम ए ग्रँड हॉल येथे आज दि. 6 ऑगस्ट रोजी झालेल्या जपान शोटोकॉन इंडिपेंडेंस कप ओपन चॅम्पियन स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले आहे. या ओपन चॅम्पियन स्पर्धेत 1500 हून अधिक खेळाडूंनी सहभाग दर्शवला होता.

बेळगाव येथील सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ इंडियन कराटेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. दहा वर्षे वयोगटात सुकित गलगली, गिरीश जत्रांनावर, अरब दोशी अथर्व पाटील, गुरुविर डी के आदींनी गोल्ड मेडल, सिल्वर मेडल पटकावले आहे.

तर चौदा वर्षीय मुलींच्या गटात रिया वेरनेकर, वंदना कुरूप, अंजली कुलकर्णी हिने प्रत्येकी फाईट आणि कटाज मध्ये गोल्ड मेडल मिळवले. व याच वयोगटात सराज देसाई अभिजित पाटील,श्रेणिक पुजारी यांनी गोल्ड मेडल व ट्रॉफी संपादन केली. वरील विद्यार्थ्याचे कोच कर्नाटक मधील सिनियर मास्टर मधू पाटील आकाश पाटील, यांचा ट्रॉफी पगडी देऊन सत्कार करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *