Friday , November 6 2026
Breaking News

उत्तराखंडातील गाैरीकुंडमध्‍ये दरड कोसळून ३ ठार; २० बेपत्ता

Spread the love

 

उत्तराखंडच्या गौरीकुंडमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्‍ये तिघांचा मृत्यू झाला असून, २० जण बेपत्ता झाले आहेत. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ धामयात्रेच्या मार्गावर हा अपघात झाला. बचाव पथकामार्फत शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. बेपत्ता झालेल्यांपैकी १७ नेपाळचे नागरिक आहेत.
उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यात रविवारी (दि. ६) रात्री पावसामुळे घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. भिंतीखाली दबून दोन मुलांचा मृत्यू झाला. दुसरीकडे नैनितालमध्ये पुलावरून जाणारी बस उलटली. प्रशासनाला या बसमधील ३५ जणांना वाचवण्यात यश आले.

About Belgaum Varta

Check Also

नूडल्स खाल्ल्याने पाच जणांचा मृत्यू? प्रकरणाला नवे वळण; मृत्यूपूर्वीच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमधून महत्त्वाचा खुलासा

Spread the love    ग्रेटर नोएडा : एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यू प्रकरणाला आता नवे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *