बेळगाव : सार्वजनिक वाचनालय बेळगाव संस्थेतर्फे श्रावण मासानिमित्त बुधवार दि. ६ ते रविवार १० सप्टेंबरपर्यंत मराठा मंदिर येथे दुपारी ३ ते सायंकाळी ७.३० वाजता संगीत भजन स्पर्धा आयोजिली आहे.
सदर स्पर्धा महिला व पुरुष अशा गटात होणार असून दोन्ही गटातील विजेत्या भजनी मंडळांना रोख प्रत्येकी १० बक्षिसे तसेच स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट मृदंग, तबला, पेटीवादक यांनाही रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. यंदा बक्षिसांची रक्कम वाढविली आहे.
सदर स्पर्धा बेळगाव शहर, खानापूर, चंदगड, बेळगाव तालुका या विभागांसाठी मर्यादित आहे. नावनोंदणीची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. स्पर्धेचे माहितीपत्रक वाचनालयामध्ये उपलब्ध असून इच्छुक भजनी मंडळांनी शनिवार वगळता सकाळी १० ते दुपारी १ व दुपारी ४ ते रात्री ८ यावेळेत संपर्क साधावा.
Belgaum Varta Belgaum Varta