येळ्ळूर : येळ्ळूर क्लस्टर क्रीडा स्पर्धांमध्ये श्री चांगळेश्वरी उच्च प्राथमिक शाळेच्या मुला-मुलींनी यश मिळविले. सांघिक स्पर्धेत थ्रो बॉल मध्ये मुलांनी व मुलींनी प्रथम क्रमांक पटकविला. तर खो-खो (मुली) द्वितीय क्रमांक पटकवला.
योगा स्पर्धेमध्ये दुर्वा पाटील, राशी पाटील, सेजल घाडी, सोहम कुगजी यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय तर ६०० मी. धावण्याच्या स्पर्धेत सिद्धी कुगजी हीने प्रथम, लक्ष्मी नायकोजी १०० मी. द्वितीय, अनुष्का चौगुले हिने २०० मी. द्वितीय तर श्रीनाथ हलगेकर १०० मी. मध्ये तिसरा क्रमांक पटकाविला.
लांब उडीमध्ये लक्ष्मी नायकोजी तृतीय, गोळाफेकमध्ये द्वितीय.
थाळीफेकमध्ये सेजल घाडी तृतीय. रिलेमध्ये दुर्वा, सिद्धी, अनुष्का व लक्ष्मी यांनी तिसरा क्रमांक पटकाविला.
विद्यार्थांना मुख्याध्यापक आय. बी. राऊत, क्रीडा शिक्षक एम. एम. डोंबले, नंदा मुचंडी, सारिका पाटील, संजीवनी धामणेकर, अंकिता पाटील, दीपा हट्टीकर, स्नेहल मजूकर तसेच संस्थेचे अध्यक्ष वाय. एन. मजुकर, सचिव प्रसाद मजुकर यांचेही मार्गदर्शन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta