Friday , March 6 2026
Breaking News

बेळगावात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : भारताचा 77वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बेळगावात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

बेळगाव बार असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन साजरा

आपल्या देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन बेळगाव जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष ॲड. सुधीर चहाण यांच्चाहरते ध्वजारोहन करून त्याला मानवंदना देण्यात आली. ‘यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव जिल्हा प्रधान सत्र न्यायाधिशा श्रीमती एल विजयालक्ष्मी देवी उपस्थित होत्या.

प्रारंभी बार असो. सेक्रेटरी ॲड. गिरीराज पाटील जॉईंट सेक्रेटरी ॲड. बंटी कपाई सदस्य ॲड. महांतेश पाटील, ॲड. आदर्श पाटील, ॲड. प्रभाकर पवार, ॲड. पूजा पाटील यांच्यावतीने महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच जिल्हा प्रधान न्यायाधिश एल. विजयालक्ष्मी देवी यांच्या शुभहस्ते तिरंगा ध्वजाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बेळगाव जिल्हा न्यायालयातील सर्व माननीय न्यायाधिश, बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी वकिल मंडळी, कर्मचारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

नवहिंद क्रीडा केंद्राच्यावतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न!

नवहिंद क्रीडा केंद्राच्यावतीने 77वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी अध्यक्ष श्री. शिवाजीराव सायनेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर नवहिंद सोसायटीचे चेअरमन श्री. प्रकाश अष्टेकर यांनी, राष्ट्रध्वजापुढे नतमस्तक होऊन देशाच्या विकासासाठी, सुरक्षेसाठी आणि देशवासीयांच्या कल्याणासाठी सदैव समर्पित राहण्याची शपथ घेऊया, असे आवाहन केले.
याप्रसंगी नवहिंद आंतरराज्य को-ऑप. क्रेडिट सोसायटी, नवहिंद मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आणि प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीचे संचालक मंडळ व कर्मचारी आणि नवहिंद क्रीडा केंद्राचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पायोनियर बँकेतर्फे स्वातंत्र्य दिन साजरा

बेळगाव : येथील पायोनियर अर्बन बँकेच्या वतीने 77 वा स्वातंत्र्य दिनोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी ठीक नऊ वाजता बँकेचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी बँकेचे व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण पाटील, संचालक सर्वश्री अनंत लाड, शिवराज पाटील, गजानन पाटील, गजानन ठोकणेकर, मारुती सिगीहळळी सुहास तराळ, विद्याधर कुरणे, सीईओ अनिता मूल्या यांच्यासह बँकेच्या सर्व शाखांचे व्यवस्थापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. सुरुवातीला कवायत झाल्यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

श्री चांगळेश्वरी हायस्कूलमध्ये स्वतंत्र दिन उत्साहात संपन्न

श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळ्ळूर संचलित श्री चांगळेश्वरी हायस्कूल प्रायमरी स्कूल यांचा संयुक्त स्वातंत्र्य दिन संस्थेच्या प्रांगणात संपन्न झाला. महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन चंद्रकांत अण्णा पाटील यांनी केले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन श्री. रामदास धुळजी यांनी केले तर ध्वजस्तंभाचे पूजन श्री. प्रसाद मजूकर व अनंत पाटील यांनी केले. ध्वजारोहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. वाय. एन. मजुकर सर यांच्या हस्ते झाले.
ध्वजवंदनानंतर गावातून जयघोष व विविध नेत्यांच्या वेशभूषेत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर आयोजित सभेत बोलताना अध्यक्ष वाय. एन. मजूकर सर यांनी अनेक स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य रक्षणाची जबाबदारी आजच्या युवा वर्गाने घ्यावी तसेच देशाच्या प्रगतीसाठी जाती पाती विसरून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले.
यावेळी प्रसाद मजूकर सर, हुंदरे सर, रामदास धुळजी, मुख्याध्यापक ए डी धामणेकर, आय बी राऊत यांची समयोजित भाषणे झाले. याप्रसंगी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी रेश्मा कुगजी, करुणा मजूकर, वेदांत कुगजी, निशिगंधा लोहार, मिताली बेकवाडकर, युविका पाटील, संध्या लोहार, सानवी बेडरे, आराध्या गुंजीकर, दुर्वा पाटील, भक्ती बिर्जे, सेजल घाडी, मिताली इंगळे आदी विद्यार्थ्यांनी भाषणे व देशभक्तीपर गीते व नृत्य सादर केली.
याप्रसंगी सुधीर लोहार, गजानन पाटील, मनोज बेकवाडकर यासह पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शालेय मंत्रिमंडळाने परिश्रम घेतले. याप्रसंगी 2001-02 च्या माजी विद्यार्थ्याकडून विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

श्री मळेकरणी क्रेडीट सौहार्द सहकारी संस्थेच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा

श्री मळेकरणी क्रेडीट सौहार्द सहकारी नि. उचगांव यांच्यावतीने 77 वा स्वातंत्र्य दिन संस्थेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. कार्यक्रम अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक चेअरमन जवाहर देसाई हे होते. व त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या फोटो पूजन ऍड. अनिल पावशे यांनी तर पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या फोटोचे पूजन रमेश घुमटे यांनी केले. दिपप्रज्वलन किशोर पावशे, शांताराम पाटील, चंद्रकांत देसाई, मारुती देसाई, प्रताप देसाई, बाळकृष्ण देसाई, बबन देसाई यानी केले. कविता जाधव, लुमाण्णा पावशे आडव्याप्पा कुरबर, सर्व सभासद, हितचिंतक उपस्थित होते.

सर्वदा मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे स्वातंत्र्य दिन साजरा 

सर्वदा मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी ली. गोंधळी गल्ली बेळगाव, यांच्या वतीने 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला, संस्थेचे संचालक संजय पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या फोटो पूजन करण्यात आले व संस्थेचे उपाध्यक्ष श्री. धनंजय पाटील यांच्या हस्ते तिरंगा झेंडा फडकवण्यात आला व राष्ट्रगीताने तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन पुरोहित, संचालक रमेश पाटील, बाबू पावशे, श्रीनाथ बेळवडी, राहुल बेद्रे, संतोष अर्कसाली, चंद्रकांत मेलगे, अनंत पावशे, संचालिका शीतल शंभुचे, सेक्रेटरी मोहन कोचेरी, शाखा व्यवस्थापक राजू मुतकेकर व इतर उपस्थित होते.

कावळेवाडी प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा 

कावळेवाडी प्राथमिक शाळेत ध्वजारोहण करण्यात आले
ध्वजारोहण वाय पी.नाईक यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळळी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे गोपाळराव देशपांडे (योग प्रशिक्षक) रवींद्र हंपीहोळी, तसेच एस.डी.एम.सी अध्यक्ष राजू बुरुड, उपाध्यक्ष मल्लापा मोरे, रवळू यळ्ळूरकर, ऍड. नामदेव मोरे, मनीषा सुतार, यशवंत मोरे, वनिता कणबरकर, रघुनाथ मोरे, मनोहर मोरे, सुरज कणबरकर मोणापा यळ्ळूरकर, यल्लापा बुरुड, युवराज नाईक आदि मान्यवर उपस्थित होते
मुख्याध्यापक बी. एस. देवरमणी यांनी स्वागत व आभार मानले.

श्री संत नामदेव मंदिरमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा

आज सर्व समाज बंधू-भगिनींच्या उपस्थितीत प्रतिवर्षा प्रमाणे श्री नामदेव दैवकी संस्थेंच्या वतीने ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. सकाळी ८.०० वा. मा. अध्यक्ष श्री. अजित दत्तात्रय कोकणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

अध्यक्षीय भाषणात श्री. अजित कोकणे यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देवून मार्गदर्शन केले. समाजाची प्रगती, एकात्मता, शैक्षणिक कार्यात समाज पुढे घेउन जाण्यासाठी तत्पर राहुन संस्थेच्या यशस्वी कार्यात समाज बांधवानी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
नंतर सौ. शुभांगी महेश खटावकर आणि चिमुकला चि.निधीश शैलेश उंडाळे यांनी देशभक्ती पर भाषणं केली. कु. नव्या कुमार माळवदे हिने भारत मातेच्या वेशभूषेत उपस्थित राहुन सर्वांचे लक्षवेधुन घेतले होते.
समाजातील कार्यकर्ते वारकरी सांप्रदायातील अभ्यासु व्यक्तिमत्व आणि नावाजलेले चार्ज अकाउंट (CA) श्री. राजेश बाळकृष्ण पतंगे यांचा अकाउंट क्षेत्रातील
*I.S.A 3.0* ह्या नामवंत परिक्षेत उत्तुंग यश मिळविल्याबद्दल समाजाच्यावतीने गौरवाध्यक्ष श्री. नारायणराव काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
समाजातील मान्यवरांचे स्वागत उपाध्यक्ष श्री. अशोक रेळेकर यांनी केले. त्या नंतर तिरंगा रॅलीस सुरवात झाली. शेकडो समाज बांधवांच्या उत्स्फूर्त सहभागाने शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली किर्लोस्कर रोड, कॅालेज रोड, चन्नमा सर्कल काकती वेस रोड वरुन श्री संत नामदेव मंदिर प र्यंत रॅली निघाली. शेवटी श्रीसंत नामदेव मंदिर मध्ये महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
रॅली यशस्वी करण्यासाठी
सुहास खटावकर, प्रविण कणेरी, प्रवीण महिंद्रकर, महेश खटावकर, नारायण(राजु) कुमठेकर, विश्वनाथ पिसे, संतोष राजगोळकर आणि अमर कोपार्डे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे सचिव श्री. शशिकांत हावळ यांनी केलं.
या कार्यक्रमास खजिनदार रोहण उरणकर संचालक दिपक खटावकर, भाऊ मुसळे, सुनिल कोरडे, हेमंत हावळ, निरंजन बोंगाळे, सुरेश पिसे, कार्यकर्ते, महीला मंडळ, युवा महिला आणि शेकडोंच्या संखेने समाज बांधव भगिनी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *