बेळगाव : धारवाडमध्ये आज सकाळी लोकायुक्तांनी छापा टाकला असून बेळगाव महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांच्या घरावर छापा टाकून कागदपत्रे तपासली जात आहेत. बेळगाव महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त असलेले संतोष अनिशेट्टर यांच्या घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला आणि सप्तपूर येथील मिशिगन लेआऊट येथील घराची झडती घेत आहेत. महत्त्वाची कागदपत्रे मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. धारवाडमध्ये कोट्यवधींचे घर असलेले संतोष अनिशेट्टर हे सध्या बेळगाव महामंडळात कार्यरत आहेत. अनिशेट्टर यांच्या घरी चौकशी सुरू केलेल्या लोकायुक्तांनी अनेक महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली असून, अधिक चौकशी सुरू केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta