बेळगाव : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बेंजी बॉईज यांनी फुटबॉल टूर्नामेंटचे आयोजन केले होते. यावेळी या स्पर्धेमध्ये जवळपास 22 जून अधिक फुटबॉल संघांनी सहभाग घेतला होता.
शेवटी या स्पर्धेमध्ये अरहान एफसी हा संघ विजयी ठरला तर राजू एफसी संघाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एंजल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष मीनाताई बेनके तसेच नवजीवन फाउंडेशनचे डॉ. सतीश चौलीगेर, सुनील शेट्टी, विशाल सोनार उपस्थित होते.
यावेळी त्यांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषिक देण्यात आले. याप्रसंगी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बेंजी, मंजू कोल्हापूरे यांच्यासह अनेकांनी टीम वर्क करून सदर स्पर्धा यशस्वी पार पाडली.
Belgaum Varta Belgaum Varta