
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील बस्तवाड गावाजवळच्या जंगलात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.
अकबर जमादार (24) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी महांतेश पुजार (28) याने बस्तवाडाजवळील जंगलात मित्राची हत्या केली आणि नंतर तो मुंडकं घेऊन गावात आला. गावकऱ्यांनी हा प्रकार पाहून पोलिसांना कळवले. त्याआधारे हारुगेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी महांतेशला ताब्यात घेण्यात आले.
खून झालेला अकबर आणि मारेकरी महांतेश हे दोघे मित्र होते आणि ते दोघे मिळून म्हशी चोरून विकायचे. त्याच्यावर हारुगेरी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, पैशाच्या कारणावरून किंवा खाजगी अश्लील व्हिडीओमुळे झालेल्या भांडणातून हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अकबरचा मृतदेह हारुगेरी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला असून, रुग्णालयाजवळ शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta