Sunday , July 26 2026
Breaking News

विषप्रयोग करून पतीच्या हत्येचा प्रयत्न; पती अस्वस्थ

Spread the love

 

कुत्रा व मांजर मृत्युमुखी

सौन्दत्ती : सौन्दत्ती तालुक्यातील गोरेबाळ गावातील एका महिलेने उप्पीटमध्ये विष घालून पतीची हत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, सौन्दत्ती तालुक्यातील गोरेबाळ गावात राहणाऱ्या सावक्का निंगाप्पा हमानी (वय ३२) व तिचा भाऊ फकिरप्पा लक्ष्मण सिंदोगी या दोघांनी मिळून निंगाप्पा याची असलेली एक एकर जमीन ताब्यात घेण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले. दोघांनी मिळून उप्पीटमध्ये विष घालून पती निंगाप्पा फकिराप्पा हमानी (वय ३५) याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने सोडलेले उप्पीट खाल्ल्याने कुत्रा आणि मांजराचा मृत्यू झाला.

पती निंगाप्पा याने पत्नी व तिच्या भावाच्या विरोधात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी सौन्दत्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *