
बेळगाव : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात झालेल्या येळ्ळूर विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या देसूर हायस्कूल, देसूरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. प्रति वर्षाप्रमाणे झालेल्या चढाओढीत सांघिक गटात मुलांच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळविला. शिवाय मुलींच्या कबड्डी संघाने द्वितीय क्रमांक संपादन केला. यासह वैयक्तिक गटात 400 मीटर धावणे स्पर्धेत कुमारी कविता गोरे हेने प्रथम क्रमांक मिळविला. 200 मीटर धावणे कुमार विनायक मादार द्वितीय क्रमांक, अडथळा शर्यत सुजल मसुरकर प्रथम क्रमांक विनायक मादार द्वितीय क्रमांक. कुस्ती 65 किलो वजनी गट कुमार प्रशांत वसूलकर प्रथम क्रमांक. कुस्ती 70 किलो वजनी गट कुमार लक्ष्मण कदम प्रथम क्रमांक, कराटे स्पर्धा कुमार प्रशांत वसूलकर प्रथम क्रमांक व महेंद्र कुंडेकर द्वितीय क्रमांक असे क्रमांक मिळवत शाळेच्या लौकिकात भर घातली आणि पुढील तालुकास्तरीय स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व शिक्षक वृंद या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. शिवाय शाळा सुधारणा मंडळ, माजी विद्यार्थी यांचे प्रोत्साहन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta