Monday , November 10 2025
Breaking News

काँग्रेसलाच सदस्यांचा कौल : माणिकराव ठाकरे

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत ग्रामपंचायत, पालिका सदस्यांचा काँग्रेसला कौल असल्याचे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांचा विजय निश्चित असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
ते संकेश्वर एसडीव्हीएस सभाभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बेळगांव विधानपरिषद निवडणूक प्रभारी म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले बेळगांव जिल्ह्यात भाजपाचे बलाबल असले तरी मतदारांचा कौल काँग्रेलला आहे. त्यामुळे भाजपाची डाळ कांहीं शिजणार नाही. भाजपानेच निवडणूक रिंगणात अपक्ष उमेदवाराला उतरवून स्वत:चे हसे करुन घेतले आहे. बंडखोर उमेदवाराचा फटका भाजपाला बसणार आहे. बेळगांव जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य, पालिका सदस्य भाजपाच्या मनमानी कार्यप्रणालीला कंटाळले आहेत. त्यांना काँग्रेसचे विचार चांगले वाटू लागले आहेत. बेळगांव जिल्ह्यात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते सक्षम आहेत. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच विजय होणार यात तिळमात्र शंका नाही.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी सुरेश कुराडे, संकेश्वर घटक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, मुक्तार नदाफ, अविनाश नलवडे, दिलीप होसमनी, नबीसाहेब हुंचाळकर, नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी, जितेंद्र मरडी, चिदानंद कर्देण्णावर, विनोद नाईक, महेश हट्टीहोळी, नारायण कदम, कुमार कब्बूरी, झाकीर मोमीन, परवेज सोलापूरे, राजू नदाफ, संतोष सत्यनाईक, प्रशांत मन्नीकेरी, सुरेश बाडकर, संतोष पाटील, काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन ८ फेब्रुवारी रोजी

Spread the love  बेळगांव : येथील प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *