बेळगाव : येथील सरकारी सरदार्स हायस्कूलमध्ये मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आल. कार्यक्रमकाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. हादिमनी होते. व्यासपीठावर मंजूषा अडके, संपदा कलकेरी, अल्ताफ जहांगीर, एम. ए. डांगी, भाग्यलक्ष्मी यलिगार, राधिका मठपाती, वासंती बेळगेरी, सुशीला गजेंद्रगड उपस्थित होत्या.
प्रारंभी विद्यार्थ्यानी गायिलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. व्यासपीठावरील पाहुण्यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अनन्या कोडली हिने मेजर ध्यानचंद यांच्या जीवनाबद्दल माहिती सांगितली. अध्यक्ष एस. एस. हादिमनी यांनी राष्ट्रीय क्रीडा धोरण व ध्यानचंद यांच्याविषयी आपल्या भाषणात आढावा घेतला. प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत क्रीडा शिक्षक विठ्ठल कामती यांनी केले. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक हणमंत मास्तीहोळी यांनी केले. मुझफ्फर कुरगुंद यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थ्यानी कवायत सादर केली. शहर क्रीडा स्पर्धेत यश मिळविलेल्या क्रीडापटूंचा यावेळी गौरव करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta