
बेळगाव : येथील जागृत देवस्थान श्री कलमेश्वर देवालय, भक्तांना पावणारा आहे. श्रावण महिन्यात बिजगर्णी गावात मोठ्या उत्साहात धार्मिक विधी केल्या जातात. त्यामुळेच श्री कलमेश्वर मंदिराचे बांधकाम कमिटीने हाती घेतले आहे. जवळ जवळ अर्धेअधिक बांधकाम पूर्ण झाले आहे.
नुकताच मंदिरात पूजन करण्यासाठी नंदी व पिंडी बनवून कारागिरांना भेटुन कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे आकर्षित मूर्ती बनविण्यास सांगितले आहे.
यावेळी गावातील ग्रामस्थ मंडळचे चेअरमन वसंत अष्टेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोकणातील कारागिरांना भेटुन मूर्ती पसंत केली आहे
यावेळी गावातील चेअरमन वसंत अष्टेकर, श्रीरंग भास्कळ, विष्णू मोरे, प्रकाश भास्कर, जकापा मोरे, विष्णू कोळी, यशवंत जाधव,भाऊ बर्डे, गावडू मोरे, सुभाष पाटील, अशोक तारीहाळकर, के.आर.भाषकळ, लक्ष्मण ना.भाष्कर, संदीप अष्टेकर (ग्रामपंचायत सदस्य,) आदि ग्रामस्थ उपस्थित होते
श्री कलमेश्वर मंदिराचे बांधकाम वेळेत व सुव्यवस्थित रितीने होण्यासाठी सर्वांचं सहकार्य लाभत आहे. यातून भक्ती , निष्ठा, एकतेची भावना वाढीस लागते असा विचार पुढे येताना दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta