बेळगाव : शेतकरी विरोधी धोरणाविरोधात 8 सप्टेंबर रोजी सर्व तालुका केंद्रांवर आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजप रयत मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इराण्णा कडाडी यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, काँग्रेस सरकारच्या शेतकरी विरोधी, जनविरोधी धोरणाच्या विरोधात आम्ही याआधी जिल्हास्तरावर आंदोलन केले आहे. आता सर्व शेतकऱ्यांना संघटित करून तालुका केंद्रावर राज्य सरकारच्या द्वेषाच्या राजकारणाविरोधात लढा देणार आहोत. सरकारला भाजपबद्दल द्वेष आहे. पण तुम्ही शेतकरीविरोधी धोरण का अवलंबत आहात? असा प्रश्न त्यांनी केला. राज्यातील जनतेने तुम्हाला तसे अधिकार दिलेले नाहीत, शेतकऱ्यांशी संबंधित प्रकल्प रखडले आहेत, याविरोधात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मला राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना विचारायचे आहे, राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे, 14 धरणांमध्ये पाणीसाठा कमी आहे, शेतकर्यांच्या विहिरी किंवा बोअरवेलचे पाणी घेण्यासाठी पुरेशी वीज मिळत नाही, आणखी काँग्रेस सरकारच्या 100 दिवसात 50 हून अधिक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत, शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सरकारने काम करावे. काँग्रेस सरकारने नव्या हमी योजना राबवल्या. मात्र नवीन एपीएमसी कायदा, किसान सन्मान योजना, कृषी कायदा, रयत विद्यानिधी योजना , भूसीरी योजना या, श्रमशक्ती अशा शेतकरी हिताच्या मागील सरकारने राबविलेल्या योजनां बंद करण्यात आल्या आहेत. सरकारच्या निदर्शनास या सर्व बाबी आणून देण्यासाठी 8 सप्टेंबर रोजी सर्व तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे रयत मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इराण्णा कडाडी यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत माजी आमदार तसेच बेळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अनिल बेनके, माजी आमदार तसेच भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील तसेच शरद पाटील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta