बेळगाव : बेळगाव जिल्ह्याने भारतीय जनता पक्षाला नेहमीच शक्ती प्रदान करण्याचे काम केले आहे. कर्नाटक राज्यात सर्वाधिक आमदार या जिल्ह्यातूनच निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विजयाची परंपरा विधान परिषद निवडणुकीतही कायम राहील.
बेळगाव जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या कष्टामुळेच भाजपने आजवर यश संपादित केले आहे. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे काँग्रेस नेते हताश झाले आहेत. डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांना विधान परिषद निवडणुकीत अपयशाची जाणीव झाली आहे. हताश झालेले काँग्रेस नेते पराभवाच्या भीतीने उलटसुलट विधाने करत आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर सिद्धरामय्या यांना गरिबांचा कळवळा येत असतो. मात्र आमच्या सरकारने नेहमीच गोरगरीब जनतेच्या समस्यांचे काळजी घेत त्यांच्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे. आमच्या सरकारने केलेल्या यशस्वी जनकल्याण योजनेमुळे भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश प्राप्त होत आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार महांतेश कवटगीमठ निश्चित विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी रिजेंटा रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केला.
रमेश जारकीहोळी यांच्या पवित्र्यावर मुख्यमंत्र्यांचे आस्तेकदम, आमदार बंधूकडून सारवासारव
अवघ्या दोन दिवसांवर विधान परिषद निवडणूक आली आहे. भाजप आम. रमेश जारकीहोळी यांनी निपाणी येथील प्रचारसभेत अपक्ष उमेदवार आणि आपले बंधु लखन जारकीहोळी यांना मतदान करण्याचे आवाहन केले. आम. रमेश जारकीहोळी यांच्या पवित्र्यामुळे भाजप गोटात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान आज मंगळवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई बेळगावात आले होते.
रिजेंटा रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला बर्याच उशिरानंतर रमेश जारकीहोळी यांनी व्यासपीठावर उपस्थिती दर्शविली. यावेळी सार्यांच्या नजरा रमेश जारकीहोळी यांच्याकडेच खिळल्या होत्या. या मेळाव्यात रमेश जारकीहोळी यांचे बंधू व भाजप आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी रमेश जारकीहोळी यांच्यासंदर्भात गैरसमज पसरविले जात आहेत. खासदार मंगला अंगडी यांच्या विजयात रमेश जारकीहोळी यांचा सिंहाचा वाटा होता आहे हे कुणीही विसरू नये. गोकाक मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्याने मंगला अंगडी निवडून आल्या. याची जाणीव सर्वांनी राखावी असे सांगून रमेश जारकीहोळी यांच्या पवित्र्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
Check Also
कर्नाटक कोचिंग सेंटरमधून 50 हून अधिक विद्यार्थ्यांची एसएससी जीडी 2024 परीक्षेमध्ये निवड
Spread the love बेळगाव : विनय ल्हासे सर आणि श्रीशैल तल्लुर सरांच्या मार्गदर्शनाखाली एकाच कोचिंग …