बेळगाव : श्रावणी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून भेंडी बाजार मोतीलाल चौक येथील सिद्धीविनायक मंदिरात सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने सेवाभावातून साबुदाणा खिचडीचे प्रसाद वाटप रविवारी सकाळी 11 वाजता माजी आमदार अनिल बेनके, लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव व सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांच्या हस्ते भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
रविवारी तब्बल 101 किलोचे साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले, असे मंडळाचे अध्यक्ष रोहित रावळ यांनी सांगितले.
प्रारंभी गणेशाची पूजा माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव व सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव उपस्थित होते.
रोहित रावळ, रमेश भंडारी, राजू पालीवला, मदन तिवारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दर संकष्टीला सिद्धी विनायक मंदिरात साबुदाणा खिचडी करून गणेश भक्तांना प्रसाद वाटप करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta