
बेळगाव (प्रतिनिधी) : गोवावेस मधील बसवेश्वर सर्कल येथे टिप्परच्या धडकेत महिला ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.
सायरा मेहमुद मच्छेकर वय 50 रा.मुस्लिम गल्ली अनगोळ असे या अपघातात मयत झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.
रस्त्याच्या कामामुळे त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. तरी देखील अनेक वेळा दुचाकीस्वार अडचणीच्या मार्गावरून वाट काढण्यासाठी धडपडताना दिसतात. मात्र याच मार्गावर सोमवारी सायंकाळी एका दुचाकीस्वार महिलेचा बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकातून हळहळ व्यक्त होत आहे. दुचाकीवरून निघालेली एक महिला टिप्परच्या धडकेमुळे ठार झाली आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र या चौकामध्ये वाहतूक नियोजनासाठी रहदारी पोलिसांची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta