कुद्रेमानी समिती जनजागृती बैठक संपन्न
बेळगाव : महाराष्ट्र एकिकरण समितीच्यावतीने महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळावाला बहुसंख्येने सीमाभागातून मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्यासाठी गावोगावी जनजागृती केली जात आहे.
कुद्रेमानी येथील बलभीम वाचनालयात जनजागृती बैठक ईश्वर क. गुरव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
मराठी भाषा, संस्कृतीचे जतन करून बेळगाव महाराष्ट्राचा अविभाज्य घटक असून मराठी अस्मितेच्या लढ्याचा एक भाग म्हणून महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा महामेळावा होणारच, असे प्रतिपादन युवा समितीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी काढले.
कर्नाटक राज्याचे बेळगाव येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे. तेंव्हा त्याला विरोध म्हणून महामेळावा व्हॅक्सीन डेपो येथे 13 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
रवी पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून कुद्रेमानी म. ए. समितीच्यावतीने बहुसंख्येने महामेळाव्याला पाठिंबा दर्शविला. यावेळी आंबेवाडी अध्यक्ष चेतन पाटील, यल्लाप्पा सावंत, उमेश पाटील, कांतेश चलवेटकर व यल्लाप्पा होनगेकर समिती कार्यकर्ते तसेच यावेळी कुद्रेमानी समिती कार्यकर्ते माजी ग्राम पंचायत सदस्य काशिनाथ आप्पुनी गुरव, महादेव गुरव, शांताराम गुरव, जोतिबा पाटील, एम. बी. गुरव, बडकू गुरव, विठ्ठल पाटील, मारुती शां. पाटील व विशाल गुरव उपस्थित होते.
शेवटी आभार महादेव गुरव यांनी मानले.
Check Also
अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे ५ जानेवारीला लोकार्पण
Spread the love बेळगाव : अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवार दि. …