Thursday , March 5 2026
Breaking News

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या झाडाझडतीमुळे मानसिक ताण येऊन अधिकाऱ्याला भोवळ

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव महापालिकेतील महसूल खात्याच्या बैठकीत वरिष्ठ अधिकार्‍यांनी घेतलेल्या झाडाझडतीमुळे मानसिक ताण येऊन एका अधिकाऱ्याला उभ्या-उभ्याच भोवळ आल्याची आणि त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव महापालिकेमध्ये आज सकाळी उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल खात्याची बैठक बोलवण्यात आली होती. महसूल वसुली सद्यस्थिती, महसूल गोळा करण्यात होणारी दिरंगाई तसेच महसूल वाढीसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात येत होती. यावेळी उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी महसूल वसुली संदर्भात उपस्थित महसूल अधिकारी श्रीकांत इराले यांना धारेवर धरले. त्यावेळी उपायुक्तांना उत्तर देताना भांबावून गेलेले श्रीकांत अचानक उभ्या उभ्या आपल्या आसनावर कोसळले. अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटल्याचे दिसून आले. रक्तदाब वाढल्याने त्यांची प्रकृती अचानक खालावली अन् ते कोसळले. या प्रकारामुळे बैठकीला उपस्थितीत सर्वांना धक्का बसून एकच धावपळ उडाली.
त्यानंतर प्रसंगावधान राखून महसूल अधिकारी श्रीकांत इराले यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कावळेवाडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ व भजनी मंडळातर्फे दरवर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *