उपाध्यक्षपदी आर. आय. पाटील यांची बिनविरोध निवड
बेळगाव : मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी तानाजी पाटील आणि उपाध्यक्षपदी आर. आय. पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवार दिनांक 11 रोजी मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या आवारामध्ये ही निवड प्रक्रिया झाली. मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची निवडणूक गेल्या काही दिवसापूर्वी झाली होती. पंधरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी अविनाश पोतदार गटाचे पाच तर शेतकरी बचाव पॅनलचे दहा उमेदवार विजयी झाले होते. यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शेतकरी बचाव पॅनलचे पारडे जड होते. त्यामुळे या शेतकरी बचाव गटाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष होणार असे जवळपास निश्चित झाले होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी अध्यक्ष पदासाठी तानाजी पाटील व उपाध्यक्ष पदासाठी आर. आय. पाटील यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचे सर्व संचालक आणि तसेच उपस्थित शेतकऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले.
यावेळी नूतन अध्यक्ष तानाजी पाटील व आर. आय. पाटील यांनी म्हणाले की, मार्कंडेय सहकारी साखर कारखाना हा बेळगाव परिसरातील एक उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना करण्यासाठी आम्ही कार्य करू यासाठी शेतकऱ्यांनी व इतर संबंधित घटकांनी आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यावेळी मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, शेतकरी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta