बेळगाव : केरीगुडू मंड्या येथील श्री माधव विद्यालय शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय अथलेटिक्स क्रीडा स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचा चमू रवाना झाला आहे.
14 ते 16 सप्टेंबर दरम्यान स्पर्धा होणार आहे, या स्पर्धेसाठी संत मीरा शालेय संघात देवेश मडकर, आदित्य सानी, सोहम ताशिलदार, अभिषेक गिरीगौडर, अश्विन जायण्णाचे, अनिरुद्ध हलगेकर, संचित धामणेकर, अथर्व पवार, यक्ष गावडे, तर मुलींच्या गटात कीर्ती मुरगोड, विना कोकाटे, समीक्षा बुद्रुक, प्रणिती मजुकर श्रावणी कुगजी, नताशा चंदगडकर, सेजल धामणेकर, प्रियांका पाटील, श्रद्धा ढवळे भावना बेरडे, भावना कौजलगी, सृष्टी तडकोड, अंजली चौगुले, आकांक्षा बोकमुरकर यांचा समावेश असून संघासमवेत शाळेच्या क्रीडाशिक्षिका मयुरी पिंगट, निरंज सावंत, विशाल बेर्डे, रवाना होत आहेत, या संघाला विद्याभारती बेळगाव जिल्हा अध्यक्ष माधव पुणेकर, संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta