बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आरती संग्रह तयार करण्यात आला. त्याचे प्रकाशन आज छत्रपती शिवाजी उद्यानमध्ये करण्यात आले.
प्रथम महाराजांच्या मूर्तीला नगरसेवक शिवाजी मंडोळकर आणि समितीचे युवानेते मदन बामणे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्रीमूर्तीचे पूजन प्रकाश मरगाळे व अंकुश केसरकर यांच्याहस्ते करण्यात आले, त्यानंतर आरती संग्रहाचा प्रकाशन सोहळा मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, युवा नेते मदन बामणे, कोरे गल्ली पंच शांताराम मजुकर, शिवाजी मजुकर, माजी पंच शिवाजी हावळानाचे, माजी नगसेवक राजू बिर्जे, विजय भोसले, राजकुमार बोकडे, राजाराम मजुकर, सुधीर नेसरीकर, सुनील बोकडे, गजानन शहापूरकर, बाळू कुरळे, सुनील बोकडे, रणजीत हावळानाचे, अभिजीत मजुकर, श्रीकांत कदम, प्रभाकर पाटील, रोहित वायचळ, सूरज गवळी, परशराम शिंदोळकर, महादेव सोमजीचे, दीपक गौंडवाडकर, विजय ढम यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना कोरे गल्लीतील म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करून समिती ही सिमप्रश्नासोबतच धार्मिक आणि सामाजिक कार्यातसुद्धा अग्रेसर असल्याचे सांगितले.
यावेळी १५०० आरती संग्रह छपाईसाठी म. ए. समितीचे युवा नेते मदन बामणे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, प्रतीक टूर्सचे संचालक प्रतीक गुरव, गोवावेसचा राजा मंडळ, कोरे गल्ली गणेशोत्सव मंडळचे अध्यक्ष अरुण कडोलकर यांनी आर्थिक मदत केली.
या आरती संग्रहाचे समितीच्या कार्यकर्त्यांकडून आजूबाजूच्या परिसरात वाटप करण्यात येईल, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta