मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, शहापूर विभाग यांचेकडून स्तुत्य उपक्रम
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभाग यांचेकडून प्रत्येक वर्षी नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून आपल्या विभागातील पोलीस स्टेशन, पोलीस ऑफिसर, वीज महामंडळ, त्यांचे प्रमुख विभागीय अधिकारी, अग्नीशमन दलाचे अधिकारी, शहापूर विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, सामाजिक प्रमुख कार्यकर्ते, विभागातील नगरसेवक या सर्वांच्या संपर्कासाठी आवश्यक असणारे फोन नंबर याबाबतचे माहिती पत्रक प्रत्येक गणेश मंडपात लावण्यासाठी प्रकाशित केले जाते. यावर्षीही हा माहिती पत्रक प्रकाशन सोहळा, व्यापारी बंधू गणेशोत्सव मंडळ खासबाग-बेळगाव येथील गणेश मंडपात आयोजित करण्यात आला होता.
प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून म. ए. समितीचे नेते श्री. रमाकांत कोंडूस्कर आणि माजी महापौर श्री. मालोजी अष्टेकर हे उपस्थित होते. उभयतानी या अत्यंत आवश्यक अशा माहिती पत्रकाबाबत आणि त्याचे प्रकाशन करण्याच्या स्तुत्य उपक्रमाबाबत शहापूर विभागाच्या गणेशोत्सव महामंडळाचे कौतुक केले. अशा कार्याची सर्व विभागात आवश्यकता आहे, अशा शब्दात शहापूर विभाग मंडळाला धन्यवाद दिले.
या प्रकाशन सोहळ्यासाठी शहापूर विभाग गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्री. नेताजी जाधव (माजी नगरसेवक), श्री. संजय शिंदे (माजी उपमहापौर), श्री. नितीन जाधव (नगरसेवक), श्री. दिनेश मेलगे (अध्यक्ष व्यापारी बंधू गणेशोत्सव मंडळ-खासबाग), श्री. अर्जुन देमट्टी (सामाजिक कार्यकर्ते) याप्रसंगी अमृत भाकोजी, संतोष कणुकले, सुनील गोरले, सुभाष शिनोळकर, रमेश शेठ, राजू सुतार, वासू सामजी आदी उपस्थित होते. शेवटी आभार अशोक चिंडक यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta