बेळगाव : बेळगाव येथील ‘जायंटस् ग्रुप ऑफ बेळगाव मेन’ यांच्यावतीने उद्या रविवारी 24 रोजी महिलांकरीता कुस्ती व कबड्डी स्पर्धा बालिका आदर्श विद्यालय टिळकवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.
सदर कबड्डी स्पर्धा ही हायस्कूल मधील मुलींसाठी तर कुस्ती स्पर्धा ही महिलांसाठी वजनी गटात आयोजित करण्यात आली आहे. वजन गट 25 ते 30 किलो 30 ते 35 किलो 35 ते 40 किलो 40 ते 45 किलो 45 ते 50 किलो व 50 किलो वरील महिला कुस्ती पटूंसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
रविवारी सकाळी ठीक 9.30 ते 11 वाजेपर्यंत वजन देण्यासाठी हजर रहावे. सदर कुस्ती स्पर्धा ही बालिका आदर्श कुस्ती संकलनतील मॅटवर आयोजित करण्यात आली आहे. तरी महिला कुस्तीपटूनी टिळकवाडी येथील बालिक आदर्श हायस्कूल येथे उपस्थित रहावे असे आवाहन बेळगाव जायंटस् ग्रुप ऑफ मेन बेळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta