
बेळगाव : शनिवारी सुटी असताना बार कामगारांमध्ये भांडण होऊन गळा कापून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून फेकल्याची घटना काल रात्री घटप्रभा येथे घडली.
संजू हा घटप्रभा येथील एका बारमध्ये गेल्या एक महिन्यापासून काम करत होता. काल बारला सुट्टी होती. काही कारणावरून रात्री कामगारांमध्ये भांडण झाले. त्यामुळे अनर्थ घडला. त्यातील तिघांनी एकत्र येऊन संजूचा गळा चिरला. त्यानंतर त्याला दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याची माहिती आहे.
बारच्या आवारात संजू नावाच्या कामगाराचा मृतदेह आढळून आला, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बारमध्ये उपस्थित तीन तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली.
Belgaum Varta Belgaum Varta