
बेळगाव : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सरकारी नोकर भरतीसाठी सध्या पात्र उमेदवारांची माहिती मागविण्यात येत आहे. अनेक मराठी उमेदवार यासाठी अर्ज करीत आहेत. या पदासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या कारणास्तव सीमाभागातील मराठी भाषिक उमेदवारांचे अर्ज नाकारले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व पदांकरिता महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांसाठी 5 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात यावी अशा आशयाचे पत्र मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्र शासनाकडे पाठविले आहे. या पत्रात सीमाभागातील पात्र उमेदवारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सर्व खात्यास आवश्यक ते आदेश द्यावेत व शासकीय सेवेत सीमा भागातील होतकरू तरुणांना संधी मिळवून द्यावी, अशी कळकळीची विनंती करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta