Friday , March 6 2026
Breaking News

परस्परांशी चर्चा करून व्यवहार सुरळीतपणे पार पाडा : जिल्हाधिकारी नितेश पाटील

Spread the love

 

एपीएमसी – जय किसान मार्केट व्यापाऱ्यांची बैठक

बेळगाव (वार्ता) : शहरातील एपीएमसी व जय किसान भाजी मार्केट या दोन्ही ठिकाणी व्यावसायिक व्यवहार करण्याची संधी असून व्यापारी संघटनांनी परस्परांशी चर्चा करून व्यवहार सुरळीतपणे पार पाडावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली.

शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (ता.१०) आयोजित एपीएमसी व जय किसान भाजी मार्केट व्यापारी असोसिएशनच्या सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
वाहतूक समस्या, व्यवसाय व्यवहार रखडलेल्या समस्या, शेतकरी बाजारात न येणे यासह विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या असून, त्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.
दोन्ही बाजारातील व्यापाऱ्यांनी एकमेकांशी चर्चा करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतरही उर्वरित प्रश्न सुटले नाहीत, तर मंत्री व आमदारांच्या उपस्थितीत दुसरी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बैठकीला जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी हर्षल भोयर, शहरातील एपीएमसी तसेच जय किसान मार्केटचे व्यापारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *