
बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज शुक्रवारी बेळगाव जिल्हा प्रशासन आणि कन्नड आणि संस्कृती विभागाच्या वतीने चन्नम्मा कित्तूर उत्सव 2023 चा भाग म्हणून विधान सौधासमोर आयोजित केलेल्या ज्योती यात्रेचा शुभारंभ केला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चन्नम्माच्या कित्तूर महोत्सवाच्या ज्योती यात्रेचे उद्घाटन केले.
स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या वीर नारी कित्तूर राणी चन्नम्मा या तरुण पिढीला प्रेरणा आहेत. प्रत्येकाने या देशावर आणि भूमीवर प्रेम केले पाहिजे. ती प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे.कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या वीर आदर्श जीवनाचा आदर्श तरुणांना अंगिकारावा.माझ्या मुख्यमंत्री काळातच कित्तूर राणी चन्नम्मा यांची जयंती साजरी करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून आजतागायत ही जयंती शासनातर्फे दरवर्षी साजरी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कित्तूर महोत्सवाच्या लोगोचे प्रकाशन केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव गोविंदराजू, आमदार विनय कुलकर्णी, बाबासाहेब पाटील, महांतेश कौजलगी, कन्नड व सांस्कृतिक विभागाचे संचालक डॉ. के. धरणीदेवी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta