Thursday , December 11 2025
Breaking News

खोट्या कागदपत्रांद्वारे जमीन बळकावल्याप्रकरणी एकाची निर्दोष सुटका

Spread the love

 

बेळगाव : खोटी कागदपत्रे तयार करून स्वतःच्या भावालाच फसविल्याच्या आरोपातून एकाची खानापूर येथील जेएमएफसी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संभाजी मारुती ओऊळकर (वय ७०, रा. गौळवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी विलास मारुती ओऊळकर आणि संशयित संभाजी हे सख्खे भाऊ आहेत. खानापूर तालुक्यातील बैलूर गावामध्ये वडिलोपार्जित ४ एकर २२ गुंठे जमीन आहे. सदर जमीन संभाजी यांनी मीच विलास ओऊळकर असल्याची कागदपत्रे दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता.

खानापूर येथील सबरजिस्टार ऑफिसमध्ये दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत सह्या करून सरकारी अधिकाऱ्याला मी विलास आहे, असे सांगून त्याने छायाचित्रदेखील काढून घेतले होते. हे करत असताना अनेक खोटी कागदपत्रे त्याने तयार करून दिली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर खानापूर पोलिसांनी भा. दं.वि. कलम ४६५, ४६७, ४६८, ४७०, ४७१, ४२० आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी न्यायालयामध्ये साक्षी तसेच कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. मात्र साक्षीदारांतील विसंगतीमुळे संशयित संभाजी ओऊळकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांच्यावतीने ऍड. मारुती कामाण्णाचे व ऍड. मारुती कदम यांनी काम पाहिले.

About Belgaum Varta

Check Also

उच्च न्यायालयाचा बेळगाव पोलीस प्रशासनाला दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव पोलीस प्रशासनाला चांगला दणका देताना खोटे-नाटे गुन्हे नोंदवून गुन्हेगारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *