Thursday , March 5 2026
Breaking News

काळ्यादिनाबाबत मध्यवर्ती समितीने घेतली पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांची भेट

Spread the love

 

बेळगाव : 1 नोव्हेंबर काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर सायकलफेरीचा मार्ग आणि काळ्यादिनाबाबत पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांची मध्यवर्ती म. ए. समिती नेत्यांनी भेट घेऊन निवेदन पत्र दिले.

1956 पासून महाराष्ट्र एकीकरण समिती 1 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या पक्षपाती निर्णयाविरोधात काळादिन पाळत आहे.

या दिवशी सकाळी निषेध फेरी निघते आणि त्यानंतर मराठा मंदिर येथे जाहीर सभा होते, अशी माहिती देण्यात आली.
यावेळी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड, राजेंद्र प्रसाद चौक, समादेवी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडे बाजार, गणपत गल्ली, मारूती गल्ली, हुतात्मा चौक, किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, हेमुकलानी चौक, शनी मंदिर, पाटील गल्ली, फोर्ट रोड, देशपांडे पेट्रोल पंप, फुलबाग गल्ली, ताशिलदार गल्ली, कपिलेश्वर रोड, भांदूर गल्ली, तानाजी गल्ली, संभाजी उद्यान, एसपीएम रोड, शिवाजी उद्यान, बसवान गल्ली, पिंपळ कट्टा, पी. बी. रोड, नार्वेकर गल्ली, बालाजी मंदिर, आचार्य गल्ली, गाडे मार्ग, सराफ गल्ली, काकेरू चौक, बसवान गल्ली, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, डाक बंगला, कोरे गल्ली, कचेरी गल्ली, मीरापूर गल्ली, खडेबाजार, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कल, खानापूर रोड, आरपीडी कॉर्नर, सी. डी. देशमुख रोड, पहिले रेल्वे गेट, शुक्रवार पेठ, गोवावेस ते मराठा मंदिरपर्यंत फेरी काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी मध्यवर्ती म. ए. समिती सरचिटणीस मालोजी अष्टेकर, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण-पाटील, विकास कलघटगी, आनंद आपटेकर, सागर पाटील, वैभव कामत आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *