Wednesday , March 4 2026
Breaking News

येळ्ळूरमधून हजारोंच्या संख्येने सहभागी होणार

Spread the love

 

बेळगाव : दिनांक 25/10/2023 रोजी येळ्ळूर विभाग म. ए. समितीची 1 नोव्हेंबर काळा दिनानिमित्त बालशिवाजी वाचायल येथे बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्राम पंचायत उपाध्यक्ष श्री. प्रमोद पाटील होते. येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते, माजी तालुका पं. सदस्य रावजी पाटील यांनी आपल्या विचार व्यक्त करत 1 नोव्हेंबर काळा दिन शांततेत व नियोजन बद्ध पध्दतीने करू व येळ्ळूरमधून हजारोंच्या संख्येने उपस्थित दाखवू तसेच येळ्ळूर ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष सतीश पाटील, मनोहर पाटील, मनोहर घाडी यांनी आपले विचार व्यक्त केले. यानंतर अध्यक्षीय भाषण प्रमोद पाटील यांनी केले.
येळ्ळूर ग्रा. पं. माजी अध्यक्ष सतीश पाटील, ग्रा. पं. सदस्य शिवाजी नांदूरकर, जोतिबा चौगुले, परशराम परीट, मनोहर पाटील, मनोहर घाडी, श्रीकांत येळ्ळूरकर, परशराम घाडी, ग्राम पंचायत सदस्या मनीषा घाडी, बाळकृष्ण पाटील, संदीप पाटील, सौरभ कुगजी, सौरभ जाधव, शुभम जाधव, मयूर कदम, मंथन कुगजी, अविष्कार जाधव, सागर नायकोजी, आनंद घाडी व अनेक कार्यरते उपस्थित होते. यावेळी येळ्ळूर विभागातील समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *